१९९० पर्यंत लिहायचो. तेव्हा डायरीत लिहायचो. मधली २० वर्षे काहीच लिहिले नाही. डायरी सुटली लॅपटॉप आला. कविता पण वहीपेक्षा लॅपटॉप वरच लिहायला लागलो. आता हातात पेन घेउन लिहायला घेतले तर तिसऱ्या मिनिटाला बोटे दुखायला लागतात. पण कुठेतरी ही शांतता मिटायला हवी, आणि आज ठरवले की थेट या ब्लाग वरच लिहायचे. मनात येईल ते न ठरवता लिहायचे.
एका प्रेयसीचा ब्लाग सापडला, तिचे हृदय ती लिहितेय कवितांमध्ये, लेखांमध्ये अगदी आपणच प्रेमात पडलोय असे वाटायला लागते. लगेच विएना मधे तिच्या ब्लाग चा दुवा जोडला आणि आज प्रियकराचा ब्लाग सापडला, आता तर एक एक पोस्ट तिची आणि मग त्याची वाचायला गम्मत वाटतेय. थोडीबहुत दोघांचीही ओळख असल्याने मला चटकन कळले की या दोघांचे धागे जुळलेले आहेत. असे काही सापडले की आपण पुन्हा प्रेमात पडलोय असे वाटायला लागते. हृदयाची गती वाढते.
कवितांची मिमिक्री करण्याची आयडिया रविवारच्या रेल्वे प्रवासात आली आणि मराठी कविता समूहाच्या विविध कविंच्या शैलीमध्ये काही कविता लिहिल्या तो धागा अनपेक्षितपणे सुपर हिट झाला, खुप मजा आली.
~ तुषार
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)