शनिवार, २० सप्टेंबर, २००८

कवितांचा गाव आणि शीर्षक गीत

एक कवितांचे गाव आहे.  त्या गावात सगळे कवितांवर प्रेम करतात.  कविता करतात.  कविता वाचतात.  जगभर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.  मी बोलतोय एका ऑरकूट कम्यूनिटी बद्दल.  हो त्या कम्यूनिटी चे नाव आहे कवितांचा गाव.

या कवितांच्या गावाची खासियत म्हणजे इथले रहिवासी फारच सर्जनशील आहेत.  प्रत्येक वेळी नव नवी अफलातून युक्ती काढून कवितांच्या दुनियेत प्रयोग करत असतात. हो तर या गावक-यांचा नवा प्रयोग आहे गावाचे शीर्षक गीत.

हे छायाचित्र आहे शीर्षक गीत प्रकल्पात सहभागी आणि हजर असलेल्या कलाकारांचे.  


झरे काका काय झकास पोज़ देताहेत आणि मंडळी या गीतात झरे काकांचे फक्त शब्द आहेत बरं आवाज नव्हे.  कदाचित त्यांनी मनात गाणे म्हटले असावे.

या दोन आवाजात शीर्षक गीत ऐकायला हवे असेल तर कवितांच्या गावाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष यावे लागेल हो. 

हे गीत लिहिणारे कवी खालीलप्रमाणे,

१. स्वामीजी
२. डॉ. राहूल देशपांडे
३. प्राजक्ता खाडिलकर
४. सौ. अनुराधा म्हापणकर
५. चैताली आहेर
६. अनिल 

इतक्या कवींनी मिळून लिहिलेले हे बहुधा पहिलेच गीत असावे.  डॉ. राहूल यांचे परममित्र आणि टिंग्या सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेले तरूण प्रतिभावान संगीतकार रोहित नागभिडे यांनी मैत्रीखातर या गीताला चालबद्ध केले आहे.

टिंग्या या सिनेमामुळेच माहित झालेले लोकगीताचे गायक बाळू शिंदे यांचा आवाज या गीताला लाभला आहे. 
रोहितने चाल अफलातून लावली आहे, एक गावच डोळ्यासमोर उभा राहतो.  

या माहितीसकट अनुभव तुषार ब्लाग वर माझा हा पहिला सलाम.

तुषार जोशी, नागपुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: